शिराळा,ता.३० :करवीरवासींनी अंबामाता मूळची शिराळा येथील आणि कोल्हासुराचा वध केल्यानंतर कोल्हापूर निवासिनी झाली अशी आख्यायिका आहे.शिराळ्यात सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीचे अंबामाता मंदिर आहे.
येथील अंबामाता मंदिरातील मूर्ती पाषाणावर भाताच्या कोंड्यापासून बनवलेली कमळावर बसलेली मूर्ती आहे.या मंदिराची उभारणी शेकडो वर्षांपूर्वी झाल्याने नक्की तारीख उपलब्ध नाही. तालुक्यातील उत्तर भागातील गिरजवडे येथे गिरजासुराचा वध केल्यानंतर जोतिबा व अंबामाता यांची शिराळा येथे भेट झाली.त्याठिकाणी हे मंदिर उभे करण्यात आले आहे.या भेटीमुळे या गावचे नाव अंबामातेचे वसतिस्थान असलेले गाव म्हणून "श्री आलय" पडले होते.याचबरोबर सर्पांचे येथे रक्षण होईल असा वर दिल्याचेही श्री नाथ लिलामृत,करवीर महात्म्य,श्री रामदास स्वामी यांच्या काव्यपंक्ती आदी मध्ये आहे.श्री गोरक्षनाथ यांचे येथे वास्तव असताना ते या मंदिर परिसरात भिक्षा घेऊन आल्यानंतर थांबत असत.ते या गावात वास्तव्यास असतानाच त्यांनी जिवंत नागाची पूजा सुरू केली.या मंदिरात गणेश,शनी मारुती,जोतिबा, याचबरोबर शेष नागाची मूर्ती आहे.या मंदिराचा मुख्य गाभारा व पुढील मंडप यांचे दगडामध्ये बांधकाम करण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी सात वाजता आरती असते.मंदिरात आनंदा गुरव हे पुजारी म्हणून पूजा करतात.आंबामाता ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष संभाजी गायकवाड व उपाध्यक्ष सम्राटसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शक विविध कार्यकमाचे आयोजन केले जाते.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments